लाडका शेतकरी योजना हेक्टरी मिळणार ५ हजार रुपये




परळी वैद्यनाथ ( बीड ):- 
लाडक्या बहिणी नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केली आहे विधानसभा तोंडावर आल्याने सर्व राजकीय पक्ष जोरदार कामावर लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे देखील वाढली आहे.या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती देखील आपल्या जात आहे. यातच महायुती सरकारने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती, आणि राज्यात ती योजना सुरू देखील करण्यात आली.या लाडक्या बहिण योजने वरून विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरू होते 
अशातच बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या राज्य स्तरीय कृषीमहोत्सव- २०२४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणी नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार आहे मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा देखील केली  आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बीडमध्ये बोलताना लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली.लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवण्यात येणार आहेत. आता राज्यात लाडका शेतकरी अभियान सुरु केले जाईल. त्याबरोबरच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत दिली जाईल. तसेच ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली