खामगाव (प्रतिनिधी)
खामगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानावर 'सन्मान नारी शक्तीचा' हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, खामगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक स्नेह संमेलन नव्हते, तर महिला शक्तीचा आणि त्यांच्या योगदानाचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा एक महत्वपूर्ण उपक्रम ठरला. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, आंतराष्ट्रीय खेळाडू स्नेहा कोकणे पाटील, आणि आर. जे. अक्षय यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या संवादातून आणि उपक्रमांमधून महिलांना प्रेरणा मिळाली, ज्यामुळे या संध्याकाळी एक वेगळं उत्साही वातावरण निर्माण झालेलं होतं.
कार्यक्रमात विविध योजना , संवाद , मनोरंजक खेळ आणि आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आले होते. उपस्थित महिलांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
खामगावच्या महिलांनी या कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. महिलांचा उत्साह, त्यांचा उपक्रमांमध्ये सहभाग आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेत त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले. 'सन्मान नारी शक्तीचा' या कार्यक्रमाने खामगावच्या महिलांमध्ये एकता, सामर्थ्य, आणि आत्मविश्वासाची भावना वृद्धिंगत केलेली आहे.
हा कार्यक्रम खामगावच्या महिलांसाठी एक प्रेरणादायी आणि आनंददायी अनुभव ठरला. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित करू हा माझा आपल्या सर्वांना शब्द आहे, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळेल.