राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,अमरावती (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी श्री.संतोष महात्मे यांची नियुक्ती करण्यात आली श्री.संतोष दादा महात्मे उपमुख्यमंत्री माननीय श्री.अजितदादा पवार यांचें विश्वासू कार्यकर्ते तसेच मेंढपाळ संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष, तथा स्त्री शक्ती फाऊंडेशन अमरावती चे संस्थापक अध्यक्ष असलेले आपणास आढळून येते.
" दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल !!!."
- संतोष महात्मे (जिल्हाध्यक्ष )
श्री.संतोष महात्मे हे गेल्या कितीक वर्षापासून मेंढपाळ बांधव तसेच धनगर समाजाचे सक्रिय नेतृत्व म्हणून काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,अमरावती (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी श्री.संतोष महात्मे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व जिल्ह्यातील मेंढपाळ बांधव तसेच धनगर समाजाचे कार्यकर्ते यांच्यामार्फत त्यांचा मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येते जाहीर भव्य दिव्य सत्कार करण्यात आला
त्यासाठी मनोहर खाडपे,संतोष चिकटे(जिल्हा बुलढाणा) तसेच अनेक मेंढपाळ बांधव तसेच धनगर समाजाचे असंख्य समाज बांधव उपस्थित होते.