ई पीक पाहणी संबंधी काही अडचण असल्यास तलाठी , कोतवाल तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांची घ्यावी मदत जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील बुलढाणा यांचे आव्हान...!!!

राजू बडेरे (मुख्य संपादक) 
                   पीक पाहणीची सुरुवात दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झालेली आहे. आपल्या 7/12 वर पीक पेरा स्वतः शेतकरी यांनी अँड्रॉइड फोन व्दारे नोंदणी करायचा आहे. शेतकरी स्तरावर पिक पाहणी करण्यासाठीचा अंतीम दिनांक १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे.
            सदर कामी संबंधीत शेतक-याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास, संबंधीत गावाचे तलाठी, कोतवाल तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांची मदत घेवून आपल्या पीकांची नोंदणी ई पिक पाहणी ॲप व्दारे करून घेण्यात यावी. सदर ॲप विषयी काही अडचण असल्यास संबंधीत गावाचे तलाठी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, DCS निवड तालुक्यासाठी सहाय्यक यांची मदत घ्यावी

 ई पीक पाहणी व्दारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या 7/12 वर पीक पेरा कोरा राहील. जो नंतर भरता येत नाही त्यामूळे पीक विमा, व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गीक आपत्ती या बाबत पिक विमा मिळण्यासाठी 7/12 वर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी १५ सप्टेंबर २०२४ पुर्वी आपल्या पीकांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे आवाहन डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.