भीम आर्मीचे आंदोलन स्थगित समाप्त नाही लवकर ठरवणार पुढील दिशा

भीम आर्मीचे आंदोलन स्थगित समाप्त नाही लवकर ठरवणार पुढील दिशा 


विजय दोडे (मोताळा प्रतिनिधी)

        राज्य सरकारच्या कुचकामी व नकारात्मक धोरणाविरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या गुरुवारच्या (दि. 19) दौऱ्यादरम्यान निषेध म्हणून काळे झेंडे दाखवणार होती स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्याशी काल रात्री 18तारखेला उशिरा फोन द्वारे चर्चा करून मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्याकडे या मागण्या लावून धरणार असे सांगितले. आज सकाळी पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन काही काळापुरते स्थगित ठेवण्यात येत आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी हे निषेध आंदोलन स्थगित केले आहे . परंतु आंदोलन समाप्त झाले नाही. आंदोलन सुरूच राहणार. असे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे 
           राज्य सरकारने हेतूपुरस्सर षडयंत्र करून सामाजिक न्याय विभागाचा निधी कमी केला. सामाजिक न्याय खाते हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. अडीच वर्षापासून अनेक विद्यार्थी पात्र असतानादेखील शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. स्वाधार योजनादेखील नीट कार्यान्वित नाही. शासकीय वसतिगृहामध्ये सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. दादासाहेब गायकवाड योजना पूर्णपणे - मातीत घातली.
जात पडताळणी विभाग तर भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. दलित वस्ती सुधार योजना केवळ कागदोपत्री जिवंत आहे. या विभागांतर्गत येणाऱ्या अनेक मंडळांना अध्यक्षसुद्धा नाहीत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांची हेळसांड करण्यासाठी या इमारती उभ्या केल्या की काय, असा प्रश्न यातून निर्माण होतो. यासाठी वेळीच आपण आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे.
            या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी वेळीच पूर्ण केल्या नाहीत तर पुन्हा एकदा भीम आर्मी आक्रमक पवित्रा घेऊन मंत्रालयासमोर आंदोलन करणार.
         यापूर्वीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलडाणामध्येच शासन आपल्या दारी याकार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या एक लाख स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आलेले होते. परंतु निवेदनाला मुख्यमंत्री महोदयांनी केराची टोपली दाखवली.त्यामुळे त्यांच्या या धोरणाचा निषेध करणे नाइलाज होत आहे.परंतु स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि मागण्या संदर्भात मुख्यमंत्री महोदय यांच्याशी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असे सागितले.
परंतु मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास व विद्यार्थ्यांचे भविष्य असेच अंधकारमय झाल्यास मंत्रालयासमोर भीम आर्मीच्यावतीने तीव्र आंदोलने करण्यात येतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.आमच्या समस्या व मागण्या मान्य न झाल्यास 
 येत्या 9 ऑक्टोंबर रोजी भीम आर्मीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिक कार्यालयासमोर ताकतीने मोर्चा व निषेध करण्यात येईल