राजु बडेरे (मुख्य संपादक)
सातपुड्याच्या पायथ्याशी डिजिटल न्यूज
दिनांक २२/०९/२०२४ रोजी अन्नपूर्णा व्हेज प्लाझा, जगदंबा माता चौक शेगाव येथे पुरोगामी पत्रकार संघ (भारत) राज्यस्तरीय चर्चासत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या राज्यस्तरीय चर्चासत्र कार्यशाळेसाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.विजयजी सूर्यवंशी सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.बाळासाहेब अडांगळे सर, राष्ट्रीय सचिव मा. प्रवीण परमार सर, राज्य अध्यक्ष मा.संतोष जाधव सर, राज्य सचिव मा.निलेश ठाकरे सर, अन्याय अत्याचार निवारण समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.सौ.कल्याणी धोंडगे मॅडम व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा मा.सौ.दीपा अग्रवाल, राज्य उपाध्यक्ष मा.दत्ता पाटील यांची उपस्थिती होती
या कार्यशाळेमध्ये खाली विषयावर चर्चा विनिमय व तज्ञांची व मार्गदर्शन पार पडले
१) संस्था चालविण्यासाठी पत्रकार तथा विविध कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या सभासदांचा सहभाग वाढविणे.
२) संस्थेसाठी मुख्य कार्यकारणी गठित करणे.
३) संस्थेच्या सभासदांकरिता विविध उपक्रम राबविणे.
४) संस्थेमार्फत आपण वर्षभर केलेली कामांचा अहवाल सादर करणे.
५) संस्थे मार्फत संचालित विविध समित्या गठित करणे.
६) संस्थेची कायदेशीर बाजू सांभाळण्याकरिता कायदे तज्ज्ञाची नेमणूक करणे.
७) संस्थेसाठी निधी गोळा करणे.
८) संस्थेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदाला प्रोत्साहित करणे तसेच अभिनंदनपर संदेश तयार करुन सोशल मिडीयाच्या ग्रुपवर टाकणे.
९) संस्थेबद्दल तक्रार / गैरसमज असल्यास त्या तक्रारीचे निवारण करण्यास तक्रार निवारण समिती स्थापन करणे. म्हणजेच कोर कमिटी
१०) संस्थेचा वर्धापन दिन साजरा करणे तसेच सभासदांसाठी कार्यशाळेचे आयोजन करणे.
११) संस्थेच्या सभासदांकरिता जिल्हा व तालुक्यांत पत्रकार भवन, पत्रकार निवासी कॉलनी करिता भूखंड व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे.
पुरोगामी पत्रकार संघ (भारत) राज्य उपाध्यक्ष मा.श्री.विष्णूजी प्रल्हाद कंकाळ (मुख्य संपादक दै. शब्दशस्त्र) यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली
सदर कार्यशाळा राज्यस्तरीय असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी पत्रकार बांधव उपस्थित होते.