लाडक्या बहिणीच्या खात्यात २९ सप्टेंबरला जमा होणार तिसरा हप्ता.

लाडक्या बहिणीच्या खात्यात २९ सप्टेंबरला जमा होणार तिसरा हप्ता.

राजू विजय बडेरे
मुख्य संपादक 
(एस पी डिजिटल न्यूज)


महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' चालू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये लाखो महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची म्हणून 3000 हजार रुपये जमा केलेले आहेत. त्याच प्रमाणे या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी केलं जाणार 
          महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील. दरम्यान, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतील अशी माहिती त्यांनी त्यावेळी प्रसार माध्यमांना बोलताना दिली