जळगाव जामोद (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 (बॅच-1) संशोधन व विकास अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील रस्त्याची जिल्ह्यातील दर्जान्नती
करण्यासाठ जळगाव जामोद ते तरोडा तुळजा भवानी माता रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 (बॅच-1)
संशोधन व व विकास अंतर्गत रस्ता बांधणीसाठी प्रशासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मार्फत या रस्त्याची बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. ग्राम विकास विभागाने ३२३ लक्ष रुपयांची मंजूर दिली आहे. दिनांक ४ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णय नुसार ३.३४० किलोमीटर रस्त्याचे काम प्रस्थापित आहे. हा रस्ता प्राचीन निळकंठेश्वर मंदिर जळगाव जामोद पासून तरोडा देवी संस्थान (तरोडा तुळजा) पर्यंत होणार आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेत रस्ता मिळणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्यांना त्या रस्त्याचा खूप त्रास होत होतो त्यामुळे आता त्या शिवारातील शेतकऱ्याच्या आनंदात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तसेच त्यांच्या शेतीला चांगलाच मोबदला व किंमत मिळेल याची शक्यता नाकारता येत नाही.