महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेवरच होणार

 राजु विजय बडेरे (मुख्य संपादक)
                      महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
              महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेवरच होणार अशी शक्यता आपणास नाकारता येत नाही.ऑक्टोबर-२०२४ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असलेली आपणास दिसते. तसेच नोव्हेंबर-२०२४ मध्ये पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता तर दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच मतमोजणी २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मतमोजणी होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मंत्री मंडळ कार्यरत होण्याची शक्यता आहे तत्पुर्वी सर्व कार्यक्रम पूर्ण होणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे..