नांदूरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा.

नांदूरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा. 

नांदुरा तालुका (प्रतिनिधी)

आज दिनांक २५ सप्टेंबर नांदूरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या मार्गदर्शनात महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल च्या Drug Information Centre (DIC)च्या सहकार्याने उत्साहात साजरा करण्यात आला 
                    
             नांदुरा तालुका केमिस्ट ॲन्ड ड्रगिष्ट असोसिएशनच्या वतीने खालील उपक्रम प्रामुख्याने राबविण्यात आले त्यानुसार

1)सकाळी 09:30 वाजता* *फार्मासिस्ट ओथ वाचन करण्यात आले

2) 09:30 ते 10:00 रुग्ण समुपदेशन पत्रिका वाटप करण्यात आले (सरकारी चावळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन चौक, बस स्टॅन्ड आणि लॉयन्स नेत्रालय.) 

3) सकाळी 10.00 ते 02:00 केमिस्ट बांधव तसेच औषध दुकानावरील कर्मचारी बांधवासाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजित करण्यात आले (ठिकाण* *संत जंगली महाराज लॉयन्स नेत्रालय, दूध डेअरी रोड)* 

4) सकाळी 11:00ते 12:00 निमगाव येथील वृद्धाश्रमात गरजूंना भोजन वाटप करण्यात आले  

5) वेळ सकाळी 11:00 ते 05:00 रुग्ण समुपदेशन करण्यात आले 

6) जेष्ठ फार्मासिस्ट प्रवीणजी चितलांगे यांचेकडून गरजू विद्यार्थिनीला शैक्षणिक मदत करण्यात आली 
 
          या वेळी त्यांचा असोशिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच जेष्ठ फार्मसिष्ट प्रेम काका जैन यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत संत जंगली महाराज लॉयन्स नेत्रालया च्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव लक्ष्मन वक्टे यांनी केले तर मार्गदर्शक समुपदेशन विजय डवंगे गिरिष जी चांडक यांनी केले तर फार्मसी ओथ वाचन रोषन बिचारे यांनी केले तर आभार मो.लईक यांनी मानले या वेळ मोठ्या संख्येने फार्मसिष्ट बांधव उपस्थित होते. .