सकल धनगर समाज अकोलाचे वतीने जिल्ह्यातील खासदार आमदार यांना आरक्षण अंमल बजावणी संदर्भात निवेदन

सकल धनगर समाज अकोलाचे वतीने जिल्ह्यातील खासदार आमदार यांना आरक्षण अंमल बजावणी संदर्भात निवेदन

संतोष चिकटे (प्रतिनिधी) 
बुलढाणा 

दिनांक २९ सप्टेंबर रविवार ला सकल धनगर समाज अकोलाचे वतीने अकोला चे मा अनुपभाऊ धोत्रे खासदार अकोला लोकसभा, मा रणधिरभाऊ सावरकर आमदार अकोला पुर्व, मा अमोलदादा मिटकरी आमदार विधान परिषद, मा वसंतरावजी खंडेलवाल आमदार विधान परिषद ( स्थानिक स्वराज्य संस्था ), मा विप्लवभाऊ बाजोरीया आमदार विधान परिषद ( स्थानिक स्वराज्य संस्था ), मा गोपीकिसन बाजोरीया माजी आमदार विधान परिषद ( स्थानिक स्वराज्य संस्था ) मा नितीनबापू देशमुख आमदार बाळापूर विधान सभा यांना निवेदन देऊन पंढरपूर, लातुर, नेवासा, छ संभाजीनगर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय येथे सुरु असलेल्या धनगर समाज आंदोलन कर्त्यांच्या धनगर अनु जमाती आरक्षणाची तात्काळ अंमल बजावणी करा, खिल्लारे कुटुंबाचे खोटे धनगड जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाण पत्र रद्द करा, धनगर आरक्षण अंमल बजावणी शासन निर्णय निर्गमीत करा असे निवेदन देवून स्थानिक लोक प्रतिनिधीचे धनगर आरक्षण मागणीस पाठिंबा मिळणे बाबत निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी सौ सुमनताई गावंडे माजी महापौर, सौ पुष्पाताई गुलवाडे माजीनगर सेविका, सौ विद्याताई सूर्यवंशी, श्री साहेबराव पातोंड विभागीय अध्यक्ष म अ स प्र मंच, प्रा सुरेशभाऊ दिवनाले, श्री रमेशजी उभे गुरुजी जिल्हाध्यक्ष धनगर समाज महासंघ, श्री मारोतीभाऊ दिवनाले जिल्हाध्यक्ष भ्र नि समिती, श्री श्रीरामभाऊ गावंडे, श्री श्रीकृष्णजी वैतकार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा, श्री दादारावजी सुलताने माजी पं स सदस्य, दिपक पातोंड जिल्हाध्यक धनगर समाज अधिकारी कर्मचारी संघटना, श्री अनिलभाऊ पातुर्डे प्र जिल्हाध्यक्ष म अ स प्र मंच , मनोहरभाऊ बाहे सर, नितीनभाऊ कोगदे, शंकरराव पारेकर, ज्ञानेश्वरभाऊ कवळकार, कैलासभाऊ बचे, श्री सुभाषभाऊ पातोंड,सुरज भाऊ लाखे, प्रकाशभाऊ सोनाग्रे, राजेंद्रभाऊ अघडते, श्री विलासराव नागे, श्री एकनाथराव जारंडे, श्री अरुणभाऊ वाघमारे, श्री वासुदेवराव पुंडे, श्री बाबुलालजी कात्रे, शालीग्रामजी घटाळे, इत्यादी समाज बांधव उपस्थित होते