रविकांत तुपकर यांचे शेतकऱ्याच्या विविध प्रश्न संदर्भात ४ सप्टेंबर पासून सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकाळी ९ वाजता च्या दरम्यान श्री.तुकारामज गटमणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने रॅली काढली या रॅलीमध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते
या रॅलीमध्ये शेतकऱ्यांनी.....!!!!!!!!
"सोयाबीन व कापसाची भाववाढ झालीच पाहिजे."
शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्या
शेतकऱ्याच्या खात्यात विम्याचेच पैसे लवकरात लवकर जमा करा
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत लवकरात लवकर पाहिजे
विनाअट कर्जमाफी झाली पाहिजे
अशा विविध घोषणा देत गावातील शेतकऱ्यांनी रॅली
काढली या रॅलीमध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी समाविष्ट झाले होते.