बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी)
बुलढाणा जिल्हयाला देऊळगांव राजा, सिंदखेड राजा ,लोणार ,मेहकर,खामगांव ,शेगाव ,संग्रामपूर, जळगाव जामोद ,नांदुरा ,मलकापूर ,मोताळा, इत्यादी तालुक्यांना आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत ऐलो अलर्ट दिला आहे.या अलर्टमध्ये 64.5 ते 115.5 मिलिमीटर पाऊस होईल असा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचा आहे.
ऐलो अलर्ट प्राप्त झाला असल्याने बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता आहे तरी खबरदारीचा उपाय म्हणून
१) पाऊस व विजा चमकत असतांना बाहेर जावयाचे टाळावे.
२) विजांपासून संरक्षणाकरिता दामिनी अपचा वापर करावा व झाडांपासून दुर राहावे. दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत
३) शक्य असल्यास ज्या धान्यांची कापनी झालेली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी हालवावे.
४) पाऊस व वादळ सुरु असतांना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते
तरी त्या पासुन दर राहण्याची खबरदारी घ्यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी दिल्या.