अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आता ऍक्शन मोड वर आहे लवकरच Shedule k ची अंमलबजाणी होईल

राजू बडेरे (मुख्य संपादक)

                     अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आता ऍक्शन मोड वर आहे लवकरच Shedule k ची अंमलबजाणी होईल असे विश्वसनीय सूत्राकडून कळले आहे.Schedule k कुणाला लागू होतो (RMP)संबंधी आपल्या संघटनेने अंमलबावणीबाबत ठोस निर्णय घेतला आहे. लवकरच याचे परिणाम दिसुन येतील.

Wholesalers कडून retails करिता सप्लाय व्हावा. आणि रेटेल्स कडून रुग्ण असे कायद्याला अभिप्रेत आहे

दुर्दैवाने थोड्याशा आर्थिक हव्यासापोटी काही असामाजिक तत्व या साखळी ला तोडत आहेत. मित्रांनो आपली संघटना इतके मोठे ठोस पाऊल आपल्या साठी उचलत आहे. आयुक्त स्तरावर आपला लढा सूरू आहे. अनेकदा आपणच आपले वैरी होतो, असे होऊ नये यासाठी आपण जागरूक राहावे. अनेकदा wholesalers कडे कोणी कस्टमर अथवा डॉक्टर injection, other medicines मागतो तेव्हा wholesalers नकार देतात, अशा वेळी तेच लोक आपल्या ओळखीच्या कीव नात्यातला केमिस्ट cha reference सांगून माल मिळवतात. मित्रानो केमिस्ट कोठलाही असो तो आपल्या घरातील सदस्य आहे. आज दुसरा केमिस्ट भरडला जाईल तर उद्या आपण भरडले जाऊ. अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. आपला लढा आहे, आपण लढू अशी मानसिकता ठेवून काम करा. सर्व नियम काटेकोरपणे पाळा.आपली औषध आस्थापणे संगणीकृत करा.आपल्या नावावर कोणाला माल मिळवून देऊ नाका. कोणी असे करताना आढळले तर संघटनेशी संपर्क करा. संघटना काय आहे आणि काय करते व केलेले आहे, हे जुन्या 20/25 वर्ष सेवा केलेल्या बांधवांना विचारा. आपला व्यवसाय आजच सुरक्षित करा.
       याचे भान ठेऊन आपला औषध विक्री व्यवसाय आजच सुरक्षित करा.आपले सर्वांचे सहकार्य FDA आणि संघटनेला नेहमी असावे अशी विनंती "अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य" व "केमिस्ट संघटना" यांनी केली आहे..