श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात जळगाव जामोद येथे आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

जळगाव जामोद (प्रतिनिधी)

                 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व जळगाव शिक्षण मंडळ द्वारा संचलित श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय पुरुषांची व्हॉलीबॉल स्पर्धेचे सामने 4 ते 7 ऑक्टोबर या 4 दिवसांमध्ये होणार आहे. यामध्ये संत गाडगेबाबा विद्यालयात एकूण 35 महाविद्यालयीन संघांचा समावेश असणार आहे. अमरावती विभागात चौथा मानांकन असलेली चमू श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग शेगाव ही टीम सुद्धा सहभाग घेत आहे. तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्याहस्ते होणार आहे.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश मायी, अनुप पुराणिक, मिलिंद जोशी यांची पण उपस्थिती असणार आहे. या सामन्याचे उद्घाटन 4 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 9 वाजता श्रीपाद कृष्ण कोल्हटकरच्या मैदानावर होणार आहे. हे सामने बाद पद्धतीने खेळवले जाणार आहे. प्रथम विजेता व उपविजेता यांना जळगाव शिक्षण मंडळातर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या सामन्याने आयोजन डॉक्टर प्रवीण डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. के. कॉलेज क्लब यांची साथ अमोल क्षीरसागर, युगांत क्षीरसागर, प्रणित वाघ, भूषण खेडेकर, ईश्वर येऊल, अमोल भगत यांचे सहकार्य लागणार आहे. तरी क्रीडा प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.