जळगाव जामोद (प्रतिनिधी)
७ ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस कापसाच्या अविश्वसनीय अष्टपैलुत्वाचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित आहे. कापूस हा वस्त्रोद्योगातील मुख्य भाग असला तरी, पशुखाद्य, वैद्यकीय पुरवठा आणि अगदी खाद्यतेलाच्या उत्पादनातही त्याची भूमिका महत्त्वाची आहे.
कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांचे वतीने दिनांक ०७/१०/२०२४ रोजी जस्तगाव येथे जागतिक कापूस दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी श्री अमोल बनसोडे, सरपंच श्री सुमित डोसे, केव्हीके प्रमुख डॉ विकास जाधव, प्रकल्प अधिकारी श्री. अनिल गाभणे हे उपस्थित होते. अनिल गाभणे यांनी जागतिक कापूस दिवस साजरा करण्याचा उद्देश तसेच आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञान याबाबत उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले.