जळगाव जामोद (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव (जामोद) बुलडाणा विभाग दिनांक ०७/१०/२०२४ पासून जळगाव जा. आगाराची जळगाव जामोद ते बुऱ्हाणपुर ही बससेवा पूर्वरत प्रवाशांच्या सेवेत सुरू होत आहे. काही वर्षांपूर्वी ही बस सेवा बंद पडली होती परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव जामोद यांनी ही बस सेवा सुरू केली आहे
जळगाव जामोद वरून ही बस सकाळी ०७ वा. दुपारी ०१ वा. तसेच बुऱ्हाणपुर वरून ही बस सकाळी १० वा, सायंकाळी ४.३० वा सुटेल तरी सर्व प्रवाशी बंधु, भगिनी व ज्येष्ठांनी सदर सेवेचा आवश्य लाभ घ्यावे असे आव्हान आगार व्यवस्थापक पवन टाले जळगाव जामोद यांनी केले आहे