जळगाव जामोद तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचे धरणे आंदोलन सुरू

Videos जळगाव जामोद तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचे धरणे आंदोलन सुरू 

जळगाव जामोद (प्रतिनिधी)

आज दिनांक ७ /१०/२०२४ ला तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. 
   
त्यानुसार २०२३-२४ या वर्षामध्ये तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीचा पिक विमा काढला होता यामध्ये पीक विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांना अपात्र केले तर काहींना तुटपुंज्या स्वरूपाची विम्याची रक्कम दिली आहे तसेच अजूनही हजारो शेतकरी पिक विमा मिळण्यापासुन वंचित राहत आहे तरी पिक विमा कंपनीने  कोणतीही अट न लावता शेतकऱ्यांना खरीप व रब्बीचा पिक विमा द्यावा 

सध्या काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला मार्केटला नेले असता मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव ३०००-३५०० असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी या पिकाची अवस्था झालेली आहे. तर कापसाची सुद्धा हीच अवस्था असल्याने सोयाबीन-कापसाची दरवाढ शासनाने करणे गरजेचे आहे ती दरवाढ तात्काळ करावी.

मागील वर्षी २२ जुलै २०२३ ला जळगाव जामोद तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शेत पिकासह  खरडुन गेल्या होत्या त्या नुकसान भरपाई पासून अनेक शेतकरी अजूनही वंचित आहे. जवळपास एक वर्षापासून ते शेतकरी तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहे मात्र अजुनही त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये नुकसानीची मदत मिळतांना दिसत नाही. या वंचित असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ या मागणीसाठी साठी. तसेच 

फेब्रुवारी २०२४ ला जळगाव जामोद तालुक्यातील काही मंडळामध्ये गारपीट झाली या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे गहू, कांदा ,हरभरा, ज्वारी, मक्का व आदी काही पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
त्याचबरोबर...!!!
सोयाबीन-कापुस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने हेक्टरी ५००० रुपयाचे अनुदान जाहीर केले होते यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे यादीमध्ये नाव नसल्याने त्यांना अनुदानापासुन वंचित राहावं लागत आहे त्या शेतकऱ्यांना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांना सुद्धा शासनाने जाहीर केलेले  अनुदान द्यावे.

तालुक्यामध्ये अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम चालु असतांना शासनाने अचानक उर्वरित सर्व हप्ते निधी अभावी बाकी ठेवल्याने अनेकांना कित्येक दिवसांपासून घरकुलाच्या चेकची वाट पहावी लागत आहे त्यामुळे अनेकांचे आठ-दहा महिन्यापासुन घराचे बांधकाम हे अधुऱ्या अवस्थेत आहे. त्यामुळे उर्वरित घरकुलाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी.
या मागण्यांसाठी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सोमवार दि. ७ /१०/२०२४ ला तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन देण्यात आले.

इत्यादी मागण्या करीता आज  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन देण्यात आले.


यावेळी अजय गिरी, शिवदास खिरोळकर, तुकाराम गटमणे ,अनिल सिंग राजपूत, वैभव जाणे, सोपान पाटील, सदाशिव जाणे, श्याम पाटील, त्रिलोकसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर पाटील, अमोल बहादरे, सदाशिव गवई, अनिल पाटील, सागर गवई, संतोष गणगे, गजानन मोरखडे, सागर वाघ, फारुख शेख तसेच बहुसंख्या शेतकरी उपस्थित होते.