भीम आर्मी एकता मिशन राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा येथे होणार संवाद सभा

भीम आर्मी एकता मिशन राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा येथे होणार संवाद सभा 

विजय दोडे (मोताळा तालुका प्रतिनिधी)

               भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांचा झुंजवता बघता :विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आल्या आहेत.रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आज 10 ऑक्टोंबर गुरुवार रोजी बुलढाणा येथे भीम आर्मी भारत एकता मिशन कार्यकर्ता संवाद सभा राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा येथे संवाद सभेचे आयोजन केलेले आहे 
               या सभेला राष्ट्रीय महासचिव भाई अशोक कांबळे प्रभारी महाराष्ट्र प्रदेश भाई अनिल धेनवाल अध्यक्ष महाराष्ट्र कोअर कमिटी भाई राजू झनके कोकण विभाग निरीक्षक भाई सुनील भाई गायकवाड पश्चिम विदर्भ निरक्षक भाई रमाकांत तायडे येणार आहे तरी या 
सभेचे आयोजन जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ पवार यांनी केलेले आहे
          देशातील राजकारण व समाजकारण बहुजन या दोन्ही गोष्टींपासून बहुजनांची व दलितांची दिशाभूल करून दवा तंत्र वापरून आज पर्यंत बहुजन लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम प्रत्येक प्रस्थापिकांनी केले आहे बहुजनांना सत्तेत नेण्यासाठी भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यापासून सतीश पवार यांनी जिल्हाभरात युवकांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. गावोगावी संघटन मजबूत केले आहे. समाजाला सत्तेचा भाग बनविण्यासाठी गावागावात जावून आखणी केली जात आहे. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत सामाजिक परिवर्तनाची बीजे रुजवली जात आहेत. ठिकठिकाणी शाखा स्थापन करून भीम आर्मीच्या नामफलकांचे अनावरण मोठ्या जल्लोषात सुरू आहे. युवावर्गाकडून सतीश पवार यांच्यासह सहका यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. बुलढाणा मध्ये ताकद वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन बुलडाणा येथे करण्यात येत आहे.