भाजपा शिक्षक आघाडीच्या संग्रामपूर तालुका संयोजक ( अध्यक्ष ) पदी श्री.प्रविण आगरकर सर यांची नियुक्ती
जळगाव जामोद (प्रतिनिधी)
भाजपा शिक्षक आघाडीच्या संग्रामपूर तालुका संयोजक पदी श्री. प्रविण आगरकर सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ. सौ. संगीताताई शिंदे ( बोंडे ) यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी अभिनंदन केले आहे.
यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे बुलडाणा जिल्हा संयोजक श्री.प्रकाश बोदडे सर, सहसंयोजक श्री. गजाननराव गि-हे सर, सदस्य श्री. पाटील सर व भाजपा शिक्षक आघाडीचे मार्गदर्शक श्री. पंकज हळवे सर उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह जळगाव जामोद येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमा दरम्यान ही नियुक्ती करण्यात आली.
श्री.प्रवीण आगरकर सरांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, शिक्षक बांधवांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा समन्वय साधून शिक्षणक्षेत्राला, शिक्षक बांधवांना नक्कीच न्याय देता येईल असे मत भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ.सौ.संगिताताई शिंदे ( बोंडे ) यांनी व्यक्त केले आ