जळगाव जामोद शहरामध्ये ठीक ठिकाणी मातृशक्तीद्वारे आमदार डॉ.संजयजी कुटे यांचा विजयाचा जल्लोष साजरा

जळगाव जामोद शहरामध्ये ठीक ठिकाणी मातृशक्तीद्वारे आमदार डॉ.संजयजी कुटे यांचा विजयाचा जल्लोष साजरा.

राजु विजय बडेरे 
(मुख्य संपादक)

जळगाव जामोद तालुक्यामध्ये  दिनांक 23 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद शहरामध्ये ठीक ठिकाणी मातृशक्ती द्वारे आमदार डॉ.संजयजी कुटे यांचा जल्लोष साजरा करण्यात आला. जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर संजय श्रीराम कुटे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सलग पाचव्यांदा विजय मिळविला आहे.याचा आनंद पूर्ण मातृशक्तीद्वारे करण्यात. त्यामध्ये दुर्गा चौक, माळीखेल, कुंभारपुरा, तसेच शहरातील इतर ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. 
               20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हापासून महायुती महाविकास आघाडी वंचित तसेच परिवर्तन महाशक्ती यांच्यात कोण बाजी मारणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र संध्याकाळी मतदान झाल्यावर महायुती उमेदवार डॉक्टर संजय कुटे व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्यामध्ये जोरदार टक्कर होणार असल्याची चर्चा जळगाव जामोद मतदारसंघात सुरू होती. मात्र 23 नोव्हेंबर रोजी निकालाच्या दिवशी सर्व चर्चा बंद झाल्या सकाळी नऊ वाजता पासून महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे हे जळगाव जामोद मतदारसंघातील एक फेरी वगडता उरलेल्या 22 फेरीत आघाडीवर होते त्यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी टिकवून ठेवली होती. भाजपने जळगाव जामोद मतदारसंघात काँग्रेसचा पराभव करत पाचव्यांदा महाविजय मिळविला आहे याचा जल्लोष मातृ शक्ती द्वारे जळगाव जामोद शहरात करण्यात आला .