नांदुरा तालुका (प्रतिनिधी)
मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते दि. 8 डिसेंबर 2024 रोजी 95 वी शाखा आमसरी तालुका खामगाव येथे मोठ्या उत्साहात नामफलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली या नंतर संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांनी युवक समितीच्या कार्याची माहिती देऊन युवकांना संघटीत होण्याचे आवाहन करून युवकांनी उच्चशिक्षित होऊन समाज उन्नतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मोहन घुईकर यांनी केले. सदर प्रसंगी समितीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण (छोटू) पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन घुईकर, जिल्हा संघटक अविनाश कुटे, शेगाव तालुका उपाध्यक्ष प्रतीक मिरगे, खामगाव तालुका अध्यक्ष राम पारस्कर, ता. उपाध्यक्ष गोपाल हेलगे, खामगाव शहर संपर्कप्रमुख राजेश कुईटे, सचिव पवन लांडे, संघटक रोशन लाहूडकर चिखली येथील सागर पाटील घनोकार, चेतन पाटील रायपुरे, विवेक पाटील, अनंता फलके, किशोर लाहुडकर, मोहन भांबेरे, गणेश साबे, शाखा वाकुड येथील दीपक लाहुडकर, उपस्थित होते