वारुळी येथील जि. प. मराठी शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा.

वारुळी येथील जि. प. मराठी शाळेत 
 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा.

विजय दोडे 
मोताळा तालुका प्रतिनिधी 

आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी
 प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वारुळी येथे शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितित प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सावकार पिसाळ व उपाध्यक्ष सौ दीक्षाताई दोडे या उपस्थित होत्या. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी भारताचे संविधान यांचे पूजन करण्यात आले नंतर अध्यक्ष श्री सावकार पिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शाळेतील विविध वर्गातील विदयार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीते भाषणे केली.व नुकत्याच झालेल्या राजुर केंद्रस्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा वारूळी येथील वि‌द्यार्थ्यांनी अनेक क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त केले. यामध्ये वर्ग एक ते पाच या गटातील मुले व मुली दोन्ही संघ उपविजेते ठरले. तसेच वर्ग सहा ते आठ या गटातील मुले कबड्डीमध्ये उपविजेते तर मुली या खो खो यामध्ये विजेत्या ठरल्या. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात वर्ग आठवीतील जान्हवी कछवाह ही शंभर मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक तिने पटकावला. शंभर बाय चार रिले या प्रकारात वर्ग सहा ते आठ या गटातील मुली उपविजेत्या ठरल्या. सर्व विजयी खेळाडूंचे पत्रकार विजय दोडे व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांतर्फे विजय खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येऊ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विजयी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यातर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा दोडे,नंदनी वाकोडे, जान्हवी बोराडे यांनी केले व आभार प्रदर्शन कळमकर सर यांनी केले अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.गावातील समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.