ब्रजवासी गौ रक्षक सेना-भारत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चा पदी सुरज यादव तर मीडिया प्रभारी पदी राजु घाटे
राजू बडेरे (मुख्य संपादक)
जळगाव जामोद :- गौ - सेवेमध्ये सदैव अग्रेसर असणारे एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज यादव यांची गौ - सेवा कार्य पाहुन त्यांची ब्रजवासी गौ रक्षक सेना - भारत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चा पदी तर महाराष्ट्र दर्शन न्युज चैनलचे संपादक राजु घाटे यांची महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा मीडिया प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती उत्तर प्रदेश मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात गौ पुत्र संत धर्मदास महाराज जी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संरक्षक संत राधामोहन दास परमहंस बाबा जी, राष्ट्रीय संयोजक रामचंद्रदास मोनी महाराज जी, राष्ट्रीय उपाध्यक्ष निटू कुमार हिन्दू यांनी नियुक्ती केली व आपल्या हातून अशीच गौ सेवा घडावी व संघठनेला महाराष्ट्रात मजबुती होईल अशी अपेक्षा सुद्धा करण्यात आली. या नियुक्तीमुळे सुरज यादव व राजु घाटे यांचे नागरिक व गौ सेवकांकडून कौतुक होत आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा त्यांना देण्यात आल्या अशी माहिती रवींद्र दिपके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.