23 मार्च ला वसाली येथे भव्य फगवा संमेलन

23 मार्च ला वसाली येथे भव्य फगवा संमेलन

कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर

वनवासी सेवा समिती जामोद व फगवा महोत्सव समिती वसाली द्वारा आयोजित 23 मार्च ला भव्य फगवा संमेलनाचे आयोजन संग्रामपूर तालुक्यातील वसाली येथे आयोजित केले आहे त्या निमित्त १६ मार्च रोजी रात्री 8 वाजता फगवा संमेलनाची नियोजन बैठक वसाली येथील हनुमान मंदिरात पार पडली.हे संमेलन 23 मार्च रविवार रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वसाली येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.हा ४१ वा फगवा महोत्सव आहे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नरेशजी पाटील विहिंप चे सामाजिक समरसता प्रमुख मुंबई क्षेत्राचे उपस्थित राहणार आहेत सोबत रामराव महाराज अंबा आश्रम धुळकोट बोरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या कार्यक्रमाला संग्रामपूर जळगांव तालुक्यातील वनवासी बांधव उपस्थित राहणार आहेत.सोबतच जिल्हा विभाग प्रांत स्तरावरील संघ परिवार क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.दरवर्षी या कार्यक्रमाला परिसरातील वेगवेगळ्या पाड्यामधून हजारोंचे संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होतात.विविध जनजातीय बांधवांचे एकत्रीकरण सांस्कृतिक परंपरा साधू संतांचे मार्गदर्शन विविध सामाजिक कार्यकर्ते यांचे उपस्थितांना मार्गदर्शन होते.या लोकोत्सवात ढोल बासरी वनवासी वेषभूषा नृत्य गीत गायन त्यामुळे केवळ आपल्या राज्यातच नाही तर मध्यप्रदेश चे काही भागातून या लोकोत्सवा करिता वनवासी बांधव या कार्यक्रमाला येत असतात.या नियोजन बैठकीला वनवासी सेवा समिती चे संचालक तथा भाजपा नेते राजूभाऊ गांधी यांनी मार्गदर्शन केले या वेळी वसाली सरपंच सिकंदरसिंग भाबर,भारतीय मजदूर संघाचे प्रकाश बोदडे फगवा उत्सव समिती सदस्य मगन माली,लालसिंग निंगवाल,विवेक जोशी,सुरेंद्र बोदडे,शालिग्राम मानकर,विजय दहिकर, नवलसिंग राऊत,सोहन डूडवा,धनसिंग डूडवा,गिलदार डावर आदी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.