राजू बडेरे
(मुख्य संपादक)
आज दिनांक ३०/०३/२०२५ रोजी
श्री.विठ्ठल मंदिर संस्थान व विश्व हिंदू परिषद-बजरंग दल जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुढीपाडवा म्हणजे वर्षप्रतिपदा, हा भारतीय नववर्षाचा पहिला दिवस. नववर्षाच्या स्वागताचा पाडवा पहाट हा मराठी हिंदी भाव भक्ती गीताचा सुरेल व सुंदर व सुमधुर कार्यक्रम सादर करीत असते.
मागील काही वर्षांपासून सातत्याने हा कार्यक्रम जळगाव जामोद शहरामध्ये सुरू आहे. यावर्षी सुद्धा या पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन दी न्यू हायस्कूल जळगाव जामोद करण्यात आले होते त्यासाठी आज पहाटे या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी जळगाव जामोद शहरातील बहुसंख्य नागरिक हजर होते