एकतेची भावना व एकतेचे दर्शन: होळी - रंगपंचमी सण ....

एकतेची भावना व एकतेचे दर्शन: होळी - रंगपंचमी सण ....

राजु विजय बडेरे 
(मुख्य संपादक)

भारतासह महाराष्ट्रभरात विविध सण समारंभ साजरे केले जातात.त्या पैकी प्रामुख्याने होळी हा सण महत्वाचा मानला जातो.होळी म्हणजे याचा अर्थ दहन,करणे.या सणाला ग्रामीण भागात शिमगा,होलीका,होळी,या नावाने ओळखले जाते.विवीध झाडाच्या फांद्या व गौऱ्या एकत्रित करून होळी पेटवली जाते होळीला प्रदक्षिणा घालून पुरन पोळीचा नैवेद्य देवाला चढवीला जातो.थंडीचा मौसम या होळीच्या अग्नीत जळुन जातो.व गर्मीचा ऋतू उन्हाळ्यास सुरूवात होते.थोडकयात म्हणायचे असले तर थंडी जळुन गर्मीचा मौसम सुरू होतो.असाही समज आहे धार्मिक ग्रंथ व अख्यायिका मध्ये सांगीतल्या जातात की हिरण्यकश्यपू नावाचा समस्त राक्षस कुळातील राजा होता.त्याला भक्त प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता.भक्त प्रल्हाद हा श्री विष्णू भगवंत यांचा भक्त होता. तो सतत विष्णू भगवंताचा जप करायचा. हे हिरण्यकश्यपू त्यांचे वडील यांना अजीबात आवडत नव्हते.राक्षस कुळात जन्म घेतला आणि देवाचे नांव घेतो आपली राक्षस नीती विसरुन विष्णू भगवंताचे पाया पडतो म्हणून त्यांच्या वडिलांने भक्त प्रल्हाद यांना अनेक शिक्षा केल्या.होळी होलीका नावाची राक्षस कुळातील हिरण्यकश्यपू यांची ती बहिण होती.तीचे शरीर अग्नीत जळणार नाही असे त्याला वरदान होते.भक्त प्रल्हादाला ठार मारन्याची जबाबदारी होलीका यांना सोपविण्यात आली.ती भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसली. परंतु भक्तीचा महिमा मोठा.भक्त प्रल्हादाला काहि न होता होलीका अग्नीत जळुन खाक झाली.देवाने भक्त प्रल्हादांचे रक्षण केले. म्हणूनच दृष्ट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय म्हणुन होळी साजरी करतात.वाईट विचार, द्वेष, मत्सर,लोभ,कपट, दारिद्रय,आळस,क्रुर भावना,जलन,या सर्व गोष्टीचा होलीका मध्ये दहन करून एकतेची भावना, एकतेचे दर्शन, होळी रंगपंचमी सण उत्साह पुर्वक साजरा करूया,