कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती दिनांक 17 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यामध्ये सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. सोनाळा येथील सर्व शिवभक्तांनी हर हर महादेव...छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करून उत्सवास सुरुवात केली.सर्व गावकऱ्यांना नाश्ता वाटप करण्यात आला.तसेच सर्व सोनाळा नगरीतून छ्त्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये सर्व सोनाळा गावकरी सहभागी झाले होते.अत्यंत शांततेत छ्त्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक पार पडली.