शहर व तालुक्यातील चोऱ्या व इतर अवैध गोष्टीबद्दल ठाणेदार जळगाव जामोद यांना निवेदन सादर

शहर व तालुक्यातील चोऱ्या व इतर अवैध गोष्टीबद्दल ठाणेदार जळगाव जामोद यांना निवेदन सादर 


राजु बडेरे 
मुख्य संपादक

आज दिनांक १९/३/२०२५ ला शहर व तालुक्यातील चोऱ्या व इतर अवैध गोष्टीबद्दल ठाणेदार जळगाव जामोद यांना व्यापारी संघटना, जळगाव जामोद च्या वतीने पोलीस स्टेशन जळगाव जामोद ला निवेदन देण्यात आले कारण असे की गेल्या काही दिवसांपासून जळगांव जामोद शहरासह संपुर्ण तालुक्यात जबरी चोरीच्या व इतर घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे व्यापारी व नागरीक भयभित झाले आहेत. चोर, दरोडेखोर व रोड रॉबरी करणा-यांना कायदयाची भिती राहीली नसल्याने हे चित्र आहे शहरात व तालुक्यात आलेल्या अनेक चो-यांचा लवकरात लवकर शोध घेवून गुन्हे करणा-यांना जबर शिक्षा करावी तसेच शहरातील सिसीटीव्ही कॅमे-यांची संख्या वाढवून त्याचे आधुनिकीकरण करावे व पेट्रोलिंग वाढवावी कारण व्यापा-यांना व्यवसाय करतांना भितीदायक वातावरण तयार होत आहे. चो-यांमुळे व्यापारी धास्तावलेले आहेत. आर्थीक मंदी, ऑनलाईन खरेदी आदींमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या व्यापारी चो-यांमुळे व्यवसाय करण्यास घाबरत आहे.तरी जळगाव (जामोद) शहर व तालुक्यात झालेल्या चो-यांचा लवकरात लवकर शोध घेवून व्यापा-यांना व नागरीकांना दिलासा देण्यात यावा यासंदर्भात आज दिनांक १९/०३/२०२५ ला शहर व तालुक्यातील चोऱ्या व इतर अवैध गोष्टीबद्दल ठाणेदार जळगाव जामोद यांना व्यापारी संघटना, जळगाव जामोद च्या वतीने पोलीस स्टेशन जळगाव जामोद ला निवेदन देण्यात आले त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्या व्यापारी उपस्थित होते.