निमा डॉक्टर्स असोसिएशन जळगाव जामोद शाखेतर्फे देशव्यापी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन.

निमा डॉक्टर्स असोसिएशन जळगाव जामोद शाखेतर्फे देशव्यापी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन. 

 ‌राजू बडेरे 
(मुख्य संपादक)

 दि.२३/०३/२०२५ नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सेंट्रल कौन्सिल यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार NIMAजळगाव आणि NIFFAयांच्या संयुक्त विद्यमाने भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या *शहीद दिनानिमित्त* *संवेदना 2.0* या नावाने देशव्यापी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .यावेळी संघटनेचे १.५ लाख पिशवी चे World record चे ध्येय असून शिबिरामध्ये *26* पिशव्या रक्त संकलन करून सर्वांनी मोलाचे योगदान दिले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी *निमा जळगाव* शाखेचे अध्यक्ष डॉ मंगेश विजय बडेरे,सचिव डॉ वैभव खिरोडकार, कोषाध्यक्ष डॉ अतुल अंबडकार माजी अध्यक्ष डॉ सतीश शिरेकार, वुमन्स फोरम अध्यक्षा डॉ सौ मंगला काळपांडे ,मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन अध्यक्ष डॉ संदीप वाकेकर ,सचिव डॉ.पुंडलिक उमरकर तसेच डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. अतुल उमाळे, डॉ. श्रीकांत अढाव, डॉ प्रवीण कपले, डॉ धनंजय मारोडे ,डॉ किशोर घाटे, डॉ पवन सुरपाटणे, डॉ. संदीप राखोंडे, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ आर एल काळपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक केदार, डॉ दिलीप डाबरे जॉइंट्स ग्रुपचे शैलेश मोदी , केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय पलन व इतर सदस्य, व्यापारी व पर्यावरण ग्रुपचे चतुर्भुजी केला तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यकर्ते व लॅब टेक्निशियन यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर शिबिरातील रक्त संकलनाकरिता सामान्य रुग्णालय खामगाव येथील डॉ प्रणाली देशमुख व डॉ राजश्री पाटील व संपूर्ण चमूने सहकार्य केले.