गुढीपाडव्याच्या दिवशी गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

गुढीपाडव्याच्या दिवशी गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन                     

राजु बडेरे 
(मुख्य संपादक)

बालविवाहाच्या अनिष्ठ प्रथेला आळा घालणे आवश्यक आहे. जिल्हा बालविवाह मुक्त होण्याकरीता सर्व यंत्रणांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.सरपंच,पोलीस पाटील,अंगणवाडी सेवीका व ग्रामसेवक शाळेचे मुख्याध्यापक व गावातील नागरिकांनी आपल्या गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. दि.३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडवा सण असून साडे तीन मुहूर्त पैकी हा एक मुहूर्त असतो या दिवशी अनेक धार्मीक विधी पार पाडल्या जातात या दिवशी देवस्थानांच्या ठिकाणी यात्रा उत्सव असतो त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात विवाह सोहळयांचे सुध्दा आयोजन करण्यात येते यामध्ये बालविवाह सुध्दा होवु शकतात तरी गावात या दिवशी विवाहअसल्यास सरपंच ,पोलीस पाटील, अंगणवाडी सेवीका व ग्रामसेवक यांनी मुला मुलींच्या वयाची शहानिशा करावी व गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. बालविवाह प्रतिबंध अधिनीयमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागा करीता बालविवाह प्रतिबंध अधिकारी असुन अंगणवाडी सेवीका त्यांना सहायक आहेत.शहरी भागांसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. गावांमध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ग्राम बाल संरक्षण समित्या गठीत असुन ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष हे सरपंच असून पोलीस पाटील हे त्या समितीचे सदस्य आहेत.त्या मुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधीत कोणतीही अघटीत घटना होणार नाही या बाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. बालविवाह झाल्यास विवाह लावणारे भटजी, मौलवी , पादरी, भंतेजी तसेच मंडपवाले, वाजंत्री, विवाह सोहळयात सहभागी होणारी वऱ्हाडी मंडळी, मंगल कार्यालय मालक, वर वधुचे आईवडील यांना शिक्षा होवु शकते. तसेच गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक,यांच्या वरही कार्यवाही प्रस्तावीत केली जावु शकते त्या मुळे असे घडु नये याची दक्षता घेण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागाद्वारे करण्यात आले आहे.