राजु विजय बडेरे
(मुख्य संपादक)
पंचायत समिती जळगाव जामोद व समाज कल्याण विभाग बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ३१/०३/२०२५ रोजी पंचायत समिती जळगाव जामोद येथे माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांचा लाभ वितरण महामेळावा व तक्रार निवारण सभा "५ % टक्के पंचायत स्तर व ५ % ग्रामपंचायत स्तर " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी जळगाव जामोद मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.संजयजी कुटे, पंचायत समिती जळगाव जामोद चे गट विकास अधिकारी मा.श्री.मोरे साहेब, भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस मा.श्री.चंद्रकांतजी शिंदे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मा.श्री.नारायण महाले तसेच जळगाव जामोद तालुक्यातील बहुसंख्या दिव्यांग बांधव उपस्थित होते. मा.श्री.संजयजी कुटे साहेब यांनी दिव्यांगांना या ५ वर्षांमध्ये सर्व कामे हक्काने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी त्यावेळी बोलताना दिले. कार्यक्रमाचे संचालन मा.श्री.श्रीकृष्ण भटकर सर यांनी केले.