राजु बडेरे
(मुख्य संपादक)
जळगाव जामोद तुळजा मेडिकल एजन्सी मध्ये ३ अज्ञात व्यक्तीने 5 मार्च च्या ४ वाजून १५ मिनिटांनी चोरीची घटना घडली.
या संदर्भात फिर्यादी मनोज वासुदेव वानखडे राहणार धानोरा महासिद्ध वय 37 वर्ष व्यवसाय मेडिकल एजन्सी हल्ली मुक्काम कृष्णा नगर जळगाव (जामोद) यांनी दिनांक 6 मार्च रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दिनांक ५ मार्च फिर्यादी यांचे घराचे कुलुप व कडीकोंडा तोडुन घराचे बेडरुमधील कपाटातुन फिर्यादी यांची पत्नी हिचे सोन्याचा राणीहार 42 ग्रॅम अंदाजे किंमत 105000/- रु, सोन्याचा नेकलेस 15 ग्रॅम अंदाजे किंमत 37500/- रु, सोन्याची छोटी पोत 5 ग्रॅम अंदाजे किंमत 12500/- रु, सोन्याची अंगठी 5 ग्रॅमची अंदाजे किंमत 12500, व सोन्याचे कानातील 5 ग्रंम अंदाजे किंमत 12500/- रु असे सर्व सोन्याचे दागिने एकुण किंमत 1,80,000/-रु कोण्यातरी अज्ञात इसमाने चोरुन नेले आहे. फिर्यादी मनोज वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 129/2025 प्रमाणे कलम कलम 305 (ए) 331(4) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करणार आहे अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात नेहमीच होत आहेत काही दिवसा अगोदर आसलगावला एका व्यापाऱ्याला लुटले माझ्या घरी आलेल्या अज्ञात तिघांच्याजवळ चाकू बंदूक असे हत्यार सोबत दिसतात त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या परिवारातील कोणी काल रात्री असते तर जीवित हानी पण होऊ शकली असती ती परिस्थिती जेमतेम असताना एक व्यवसायिक म्हणून एक व्यावसायिक आयुष्याची कमाई जमा करतो आणि काही चोर दरोडेखोर हे अशा प्रकारे चोऱ्या करून लुटून येतात अशा परिस्थितीत व्यावसायिकांनी काय करायचे कोणाला मदत मागायची असा सर्वसामान्य व्यावसायिकांना पडला आहे