विजय दोडे
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
नांदुरा /उत्तर प्रदेशातील मथुरा येथील मागासवर्गीय दोन बहिणींच्या विवाहप्रसंगी जातीवादी समुदायाकडून बहिणीवर झालेल्या अत्याचार आणि बहिष्काराची घटना घडली. या पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मथुरा येथे गेलेल्या आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या वाहन ताफ्यावर येथील जातीवादी गटाने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नांदुरा येथे आझाद समाज पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करून तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश वाकोडे व तालुका अध्यक्ष सागर मेढे हे म्हणाले भाई चंद्रशेखर आझाद हे देशातील तमाम बहुजन समाजाचेच नेतृत्व करतात. बहुजन समाजातही संसदेत आवाज उठवतात यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी. जातीवादी गुंडांना त्वरित अटक करावी, अत्याचारग्रस्त बहीण व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा ह्या उद्देशाने नांदुरा तहसील ला निवेदनसादर केले . त्या वेळी रोशन सरदार आकाश जवरे धम्मपाल तायडे पंकज इंगळे नितीन पोहरकर गणेश भोटकर संघपाल मेढे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.