कैलास खोट्टे
तालुका प्रतीनिधी संग्रामपूर
आज सोनाळा येथे रमजान महिन्याचे निमित्ताने ईद निमित्त येथील भारतीय मजदूर संघ संलग्नित ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक मजदुर संघा कडून या युनियन द्वारे मुस्लिम बांधवांना ईद निमित्त गळ्यात भेटून हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या रमजान या पवित्र मासा निमित्त उपवास करून आज ईद निमित्त येथील मुस्लिम बांधवांना युनियन चे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा शुभकामना दिल्या गेल्या यावेळी अध्यक्ष राजूभाऊ दही व उपाध्यक्ष शहेजाद भाई काझी यांनी स्थानिक हिंदु मुस्लिम बांधवां कडून पवित्र रमजान पर्वावर हिंदु मुस्लिम एकतेचे सौहार्दाचे निमित्ताने हा मिलनसार अनोखा कार्यक्रम घेतला गेला येथील काझीपुरा मस्जिद सोनाळा येथे पवित्र रमजान महिन्याचे निमित्ताने ईद निमित्त जाऊन सर्व ऑटो युनियन चे पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते येथील युनियन चे पदाधिकारी मार्गदर्शक विजय लहुकार गजाननराव देशमुख जुनेद बेग रेहमत ठेकेदार मुशिर अली व हिंदु मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.