एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशन अकोला या संस्थेचा वर्धापन दिन साजरा

एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशन अकोला या संस्थेचा वर्धापन दिन साजरा


राजु बडेरे 
(मुख्य संपादक)

एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशन अकोला या संस्थेला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दहा वर्षे पूर्ण झाले आणि संस्थेचा वर्धापन दिन हा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नविन वर्षाच्या शुभमुहूर्तावर संस्थे अंतर्गत सुरू असलेल्या स्नेहाश्रय व्यसनमुक्ती समुपदेशन आणि पुनर्वसन केंद्र मलकापूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले संस्था बालकांच्या क्षेत्रात विविध कार्य करत असल्यामुळे यावर्षीचा वर्धापन दिन हा रस्त्यांनी फिरते व्यवसाय करणाऱ्यांच्या बालकांसोबत तसेच फिरणाऱ्या बालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून करण्यात आला बालकांना शिक्षण मिळावे व शिक्षणापासून कोणतेही बालक वंचित राहू नये यासाठी संस्था नियमित प्रयत्न करीत आली आहे त्याचप्रमाणे आज बालके व्यसनाधीनते केडे वळण्याचे प्रमाण बघता संस्थे अंतर्गत 18 वर्षाखालील बालकांना मोफत समुपदेशन आणि त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन संस्थेमार्फत करण्यात येते. असा आगळा वेगळा नवीन उपक्रम संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भगवान गणोदे संस्थेचे उपाध्यक्ष मनोज जयस्वाल संस्थेच्या मार्गदर्शिका प्रांजलीताई जयस्वाल, सुनिल लाडुलकर कपिल बहाड, दिवेश,संगीता पातोंड, कैवल्य जयस्वाल आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.